म. टा. प्रतिनिधी, पुणेः पत्नीला सिगारेटचे चटके देत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी उद्योजक पती व कुटुंबातील तिघांसह आठ जणांवर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीशी संबंधित अध्यात्मिक गुरुंना चतुःश्रृंगी पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली.

रघुनाथ राजाराम येमुल (वय ४८, रा. धवलगिरी अपार्टमेंट, आयवररी इस्टेट, बाणेर) असे अटक करण्यात आलेल्या गुरुजींचे नाव आहे. या प्रकरणी २७ वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली असून, तिच्या पतीसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी सात जणांना अटकपूर्व जामीन झाला असून, पती व अन्य एक आरोपी फरार आहे. ही घटना २३ जानेवारी २०१७ पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली.

वाचाः
यांनी फिर्यादीच्या पतीला फिर्यादी पांढऱ्या पायगुणाची असून, तिची जन्मवेळ चुकीची असल्याने ग्रहमान दूषित झाले आहे, ती तुझी बायको राहिली तर तू आमदार व मंत्री होणार नाही, त्यामुळे तिला सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा तिच्याकडून काढून घे, असे सांगितले व तिच्यावरून लिंबू उतरवण्यासाठी दिले. संसार मोडण्यासाठी अनिष्ठ रुढी व अघोरी कृत्याचा वापर झाल्याचे फिर्यादीने पुरवणी जबाबात नमूद केल्यानंतर येमुल यांना अटक करण्यात आली.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here