पॅरिस: करोना महासाथीच्या आजाराचे थैमान सुरूच आहे. करोनाचा विषाणू स्वरूप बदलत असल्याने शास्त्रज्ञांसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. करोनाच्या वेरिएंटने संसर्गबाधितांची संख्या वाढत आहे. अशातच एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. बेल्जियममधील एका ९० वर्षीय महिलेला करोनाच्या दोन वेरिएंटची एकाच वेळी लागण झाली. या महिलेला अल्फा आणि बीटा वेरिएंटची लागण झाली होती. शास्त्रज्ञांनी यावर चिंता व्यक्त केली असून हे प्रकरण दुर्मिळ असल्याचे म्हटले.

एकाच वेळी करोनाच्या दोन भिन्न वेरिएंटची लागण झालेल्या या ९० वर्षीय महिलेचा मार्च २०२१ मध्ये मृत्यू झाला. महिलेचे लसीकरण करण्यात आले नव्हते. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी या महिलेला दोन वेरिएंटची लागण झाली असल्याची शंका व्यक्त केली होती. या वर्षी युरोपियन काँग्रेसमध्ये ‘क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी आणि संसर्गजन्य रोग’ या विषयावरील परिषदेत बेल्जियमच्या या करोनाबाधित महिलेच्या प्रकरणावरही चर्चा करण्यात आली.

वाचा:

जानेवारी २०२१ मध्ये ब्राझीलमधील वैज्ञानिकांनी केलेल्या दाव्यानुसार, एकाच वेळी दोन वेरिएंटची दोन जणांना लागण झाली होती. एका व्यक्तीला गॅमा वेरिएंटची लागण झाली होती. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात आली.

वाचा: श्वास घेण्याच्या त्रासानंतर मृत्यू

९० वर्षीय महिला आजारी झाल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी तिला करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. उपचारा दरम्यान या महिलेला करोनाच्या वेगळ्या वेरिएंटची लागण झाली असल्याचे डॉक्टरांना आढळून आले. त्यानंतर बाधित महिलेला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. करोना चाचणीत या महिलेला अल्फा आणि बीटा वेरिएंटची लागण झाली असल्याचे समोर आले. या महिलेचा नंतर मृत्यू झाला.

वाचा:
बेल्जियममध्ये आधीपासून अल्फा आणि बीटा वेरिएंट होते असे आल्स्टमधील ओएलवी रुग्णालयाचे प्रमुख संशोधक डॉ. अॅनी वेंकेरबर्गेन यांनी सांगितले. त्यातच या महिलेला दोन्ही वेरिएंटची लागण झाली. या महिलेला करोनाची लागण कशी झाली, हे समजले नसल्याचे त्यांनी सांगितले.

करोनाच्या सर्व वेरिएंटवर जगभरातील शास्त्रज्ञ नजर ठेवून आहेत. करोनाचा अल्फा आणि डेल्टा वेरिएंटचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे. करोना लस वेरिएंटवर प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. करोना लस घेतलेल्या व्यक्तींना करोनाची लागण झाली तरी गंभीर आजारी होण्याचा धोका कमी होत असल्याचे समोर आले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here