वृत्तसंस्था, वॉशिंग्टन/म. टा. प्रतिनिधी, पुणे

अब्जाधीश यांच्या व्हर्जिन गॅलॅक्टिक कंपनीचे ‘युनिटी २२’ अवकाशाच्या सीमेपर्यंतची उंची गाठून रविवारी यशस्वीपणे जमिनीवर परतले. १५ मिनिटांच्या प्रवासात जमिनीपासून सुमारे ८६ किलोमीटरच्या उंचीवर पोहोचून सहा अवकाशयात्रींनी पाच मिनिटांसाठी वजनरहित अवस्थेचा अनुभव घेतला. या मोहिमेत ब्रॅन्सन यांच्यासह भारतीय वंशाच्या सिरिशा बांदलाचाही सहभाग होता.

‘व्हर्जिन गॅलॅक्टिक’ कंपनीतर्फे खास अवकाश पर्यटनासाठी ” हे अवकाशयान बनवण्यात आले आहे. पूर्ण क्षमतेच्या यानाची पहिली मानवी चाचणी (युनिटी २२) रविवारी पार पडली. या मोहिमेत सहा अवकाशयात्री सहभागी झाले होते. न्यू मेक्सिको येथून व्हाईटनाईट टू या अवकाशयान वाहक विमानाने भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री आठ वाजता उड्डाण केले. त्यानंतर विमान जमिनीपासून १५ किलोमीटर उंचीवर असताना त्यापासून युनिटी २२ विलग होऊन क्षणार्धात अवकाशाच्या दिशेने झेपावले.

वाचा:
ध्वनीच्या वेगाच्या तिप्पट वेगाने प्रवास करीत यानाने जमिनीपासून ८६ किलोमीटरची उंची गाठली. या वेळी सुमारे पाच मिनिटांसाठी यानातील यात्रींनी वजनरहित अवस्थेचा अनुभव घेतला. त्यानंतर यानाने पुन्हा जमिनीच्या दिशेने प्रवास सुरू केला. वाहक विमानापासून विलग झाल्यापासून १५ मिनिटांनी यान सुरक्षितपणे जमिनीवर उतरले. मानवी अवकाश पर्यटनाच्या दृष्टीने ही चाचणी महत्त्वाची मानली जात आहे. स्पेसशिप टू मधून १५ मिनिटांच्या अवकाश प्रवासासाठी प्रत्येक सीटमागे तब्बल अडीच लाख डॉलर आकारले जाणार असून, व्हर्जिन गॅलॅक्टिककडे त्यासाठी सुमारे ६०० जणांनी नोंदणीही केली आहे.

वाचा:
भारतीय वंशाची तिसरी महिला
सिरिशा बांदला ही अंतराळात झेप घेणारी भारतीय वंशाची तिसऱ्या महिला ठरल्या आहेत. याआधी कल्पना चावला आणि सुनिता विलियम्स यांनी अंतराळात झेप घेण्याची कामगिरी केली आहे. एअरोनॉटिकल इंजिनिअर असलेल्या बांदला यांचा आंध्र प्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यात झाला होता. तर, बालपण आणि शिक्षण ह्युस्टन येथे झाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here