मुंबई : भांडवली बाजारात आज पहिल्याच दिवशी तेजी दिसून आली आहे. सेन्सेक्सने २५० अंकाची झेप घेतली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९० अंकांनी वधारला आहे. आजच्या सत्रात उज्जीवन स्मॉल बँकेच्या शेअरमध्ये २० टक्के वाढ झाली आहे.

मागील दोन सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण झाली होती. दोन्ही बाजारांवर नफावसुलीचा दबाव दिसून आला. आज मात्र गुंतवणूकदारांनी खरेदीचा ओघ सुरू केला. सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला असून तो ५२६३७ अंकावर ट्रेड करत आहे. निफ्टी ८३ अंकांच्या वाढीसह १५७७३ अंकावर आहे.

आजच्या सत्रात बँका, वित्त संस्था, इन्फ्रा, ऑटो या शेअरमध्ये वाढ झाली आहे. सेन्सेक्स मंचावरील ३० पैकी २६ शेअर तेजीत आहेत. तर एचयूएल, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक आणि बजाज फिनसर्व्ह या शेअरमध्ये घसरण झाली आहे. आयसीआयसीआय बँक, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक, ऍक्सिस बँक, एल अँड टी या शेअरमध्ये वाढ झाली आहे. तसेच एशियन पेंट, टीसीएस, सन फार्मा, पॉवरग्रीड,एनटीपीसी, टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा या शेअरमध्ये वाढ झाली आहे.

वाहन उद्योगातील मारुती सुझुकी, टीव्हीएस मोटर्स, टाटा मोटर्स, एस्कॉर्टस, बजाज ऑटो हे शेअर सध्या तेजीत आहेत. रिझर्व्ह बँकेने इक्विटास होल्डींग आणि उज्जीवन स्मॉल बँकेच्या शेअरमध्ये प्रत्येकी २० टक्के वाढ झाली आहे.

आज चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयात वाढ झाली आहे. रुपयाचे मूल्य २१ पैशांनी वधारले असून तो ७४.४३ वर आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष औद्योगिक उत्पादन, किरकोळ महागाई दर आणि घाऊक बाजारातील महागाई दराची आकडेवारीकडे लागले आहे.

गेल्या आठवड्यात ५ ते ९ जुलै दरम्यान बीएसई सेन्सेक्स ९८ अंकांनी घसरला. शुक्रवारी सेन्सेक्स १८२ अंकांनी घसरला होता. तर निफ्टीत ३८ अंकांची घसरण झाली होती. त्याआधी बाजारात गुरुवारी मोठी नफावसुली दिसून आली. सेन्सेक्स ४८६ अंकांनी घसरला आणि ५२५६८ अंकावर स्थिरावला होता. निफ्टीत १५१ अंकांची घसरण झाली आणि तो १५७२७ अंकावर बंद झाला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here