चौकात पाणी आल्यानं आता व्यापाऱ्यांनी आपल्या सामानाची हलवाहलव करत ते सुरक्षित ठिकाणी नेण्यास सुरूवात केली आहे. इतकंच नाहीतर नगराध्यक्ष जमीर खलीफे यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली असल्याचीही माहिती आहे. खरंतर, राजापूर तालुक्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे संपूर्ण शहरात पाणी घुसलं आहे. शहरात पूर पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर इथल्या मुंबई-गोवा महामार्गवर ब्रिटिशकालीन ब्रिजवर राजापूर तहसिलदार प्रतिभा वराळे, मुख्यधिकारी देवांनंद ढेकळे, नगराध्यक्ष जमिर खलिपे, स्थानिक नगरसेवक सुभाष बंड्या बाकाळकर, राजापूरचे तलाठी कोकरे यांनी वाढत्या पाण्याची पाहणी केली. जर अर्जुना नदीचे पाण्याची पातळी वाढली तर मुंबई-गोवा महामार्ग हा अवजड वाहतूकीसाठी बंद केला जाईल अशीही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, पुढचे ३ ते ४ दिवस हे कोकणासाठी धोक्याचे असून अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. शक्य असेल तरच घराबाहेर पडावं असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही रात्री पावसाने झोडपलं आहे. आताही पावसाचा जोर कायम असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात सर्वञ जोरदार वा-यासह मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचले आहे. नद्यांचीही पाणी पातळी वाढली आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या अनेक भागात राञीपासुन विद्युतपुरवठा देखील खंडित झाला आहे. हवामान विभागाने तळकोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून रेड अलर्ट जारी केला आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times