वेगुर्ले नगरपरिषदेच्या सागररत्न बाजारपेठेचा लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला. या निमित्तानं जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर आले होते. रोजच्या रोज एकमेकांवर टीका करणारे शिवसेना व भाजपचे नेतेही यावेळी उपस्थित होते. हाच धागा पकडून नीतेश राणे यांनी यावेळी शिवसेना-भाजपच्या संभाव्य युतीबाबत सकारात्मक वक्तव्य केलं होतं. ‘जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासासाठी कोणाच्याही खांद्याला खांदा देऊन काम करायला तयार आहोत, असं ते म्हणाले होते. त्यामुळं युतीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
वाचा:
याबाबत ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना केसरकर यांनी काहीशी वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. ‘काल झालेला कार्यक्रम हा विकासकामाशी संबंधित होता. अनेक वर्षे रखडलेला एक प्रकल्प पूर्ण होतोय, याबद्दल सर्वांना आनंद झाला होता. तो राजकीय कार्यक्रम नव्हता. नीतेश राणे यांच्या व्यतिरिक्त कुठल्याही नेत्यानं तिथं राजकीय वक्तव्य केलं नाही,’ असं केसरकर म्हणाले. ‘विकासासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे ही त्यांची भूमिका आम्हाला मान्य आहे. पण युती व्हावी असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी आपली यापूर्वीची वक्तव्य तपासली पाहिजेत. प्रतिविधानसभेत अलीकडंच त्यांनी ठाकरे कुटुंबाबाबत काही वक्तव्यं केली होती. (Aaditya Thackeray) यांचा डीएनए तपासला पाहिजे, असं म्हणणं योग्य आहे का? कोणीही हे सहन केलं नसतं. कुठलेही संबंध एका बाजूनं कधीच सुधारत नाहीत. त्यामुळं नीतेश राणेंनी आधी आपल्या वक्तव्यांबद्दल माफी मागितली पाहिजे. त्यानंतरच युतीबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना असेल,’ असं केसरकर म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times