मुंबईः भीमा कोरेगाव हिंसाचार व नक्षवाद्यांशी संबंधांच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या ८४ वर्षीय फादर (Stan Swamy) यांच्या मृत्यूचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेनेचे खासदार () यांनी या निमित्तानं केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर भाजपच्या नेत्या यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘८४ वर्षांचा एक गलितगात्र म्हातारा राजशकट उलथवून टाकू शकतो इतका हा देश भुसभुशीत पायावर उभा आहे काय?, असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांच्या या टीकेवर चित्रा वाघ यांनी आज उत्तर दिलं आहे. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

वाचाः

‘सामना चे कार्यकारी संपादक आणि सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊतजी हे फादर स्टॅन स्वामी, जे कोर्टाच्या निर्देशानुसार नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपामुळे कारागृहात होते, त्यांचा मृत्यू झाल्याने प्रचंड अस्वस्थ झालेले दिसतात. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचावेत यासाठी सामना वृत्तपत्राची निर्मिती करण्यात आली होती. पण संजय राऊत स्वत:च्या मखलाशीसाठी त्या विचारांना बगल देत सामनाचा गैरवापर करत आहेत. आता तर तुम्ही हद्दच ओलांडलीत. भीमा-कोरेगाव दंगलीतील मुख्य सूत्रधार आरोपी असलेल्यांना तुम्ही लेखणीतून बळ द्यायचं काम करत आहात, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

वाचाः

‘फादर स्टॅन सामी यांची तुलना तुम्ही कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी करत आहात. ज्या पद्धतीने ईंदिरा गांधी जॉर्ज फर्नांडिस यांना घाबरत होत्या त्याच पद्धतीने मोदींचे सरकार स्टॅन स्वामी यांनी घाबरत होते, असा जावई शोध तुम्ही लावलात आहात. पण एका गोष्टीचा विचार करा की या नक्षलवाद्यांना रसद पुरवणाऱ्या चीनी ड्रॅगनला मोदीजी घाबरत नाहीत, तर मग या अशा लोकांना ते स्वप्नात तरी घाबरतील का?,’ असा सवाल वाघ यांनी संजय राऊत यांना केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here