राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्या विदर्भ संयोजक गायिका वैशाली माडे या काल दौऱ्यावर होत्या. जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या बी फार्म कॉलेजमध्ये हा कार्यक्रम सुरू होता. अमोल मिटकरी यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. भाषणाचा समारोप करताना शेवटी त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘माझी मैना गावाकड राहिली… माझ्या मनाची होतीया काहिली’ ही छक्कड खड्या आवाजात गायला सुरुवात केली. गात असताना काही क्षणात त्यांचा आवाज चिरका व्हायला लागला, तोंड किंचित वाकडे होत असल्याची जाणीव तिथं उपस्थित असलेल्या काहींना झाली. त्यामुळं काही वेळ गोंधळ उडाला. उपस्थितांनी वेळ वाया न घालवता तात्काळ मिटकरी यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
वाचा:
अमोल मिटकरी यांनी स्वत: एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे. ‘माझी प्रकृती आता सुधारते आहे. चिंता करण्यासारखं काही नाही. कोविडचा काळ आहे. त्यामुळं स्वतःचा जीव धोक्यात घालून कुणीही मला भेटायला येऊ नये, अशी विनंती मिटकरी यांनी कार्यकर्ते, मित्रमंडळी व हिंतचिंतकांना केली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times