कोल्हापूर: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जयवंत शिंपी यांची बिनविरोध निवड झाली. भाजपने या निवडणुकीत माघार घेतल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, सभापती पदे शिवसेनेला देण्यात येणार आहेत. ( Election)

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील व उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे ही दोन पदे रिक्त होती. याशिवाय चारही विषय समित्यांचे सभापतीनीही राजीनामे दिल्यामुळे या सर्व पदांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. अध्यक्षपद काँग्रेस की राष्ट्रवादीला याबाबत गेले आठ-दहा दिवस नेत्यांमध्ये वादविवाद सुरू होता, पण अखेर काँग्रेसने बाजी मारली.

वाचा:

पालकमंत्री , ग्रामविकास मंत्री यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावे घोषित केली. अध्यक्षपदासाठी आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील () यांना संधी देण्यात आली. उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जयवंत शिंपी यांना यांना लॉटरी लागली. विजय बोरगे हे या पदासाठी स्पर्धेत होते. पण त्यांचे नाव मागे पडले.

आमदार पी. एन. पाटील हे गोकुळ निवडणुकीत भाजपचे महादेवराव महाडिक यांच्यासोबत होते. त्यानंतर मात्र जिल्ह्याच्या राजकारणात आपण काँग्रेस अर्थात महाविकासआघाडी सोबतच राहणार असल्याचे स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलासाठी टाकलेला शब्द काँग्रेसच्या नेत्यांना मान्य करावा लागला. शिवाय भाजपनेही निवडणुकीतून माघार घेत बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा केला.

वाचा:

दुपारी जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत या दोघांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. आगामी जिल्हा बँक, विधान परिषद निवडणूक आणि इतर काही जिल्हा पातळीवरील राजकारणाच्या दृष्टीने पालक मंत्री पाटील यांनी बेरजेचे राजकारण केले.

…आणि भाजपनं माघार घेतली!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, प्रा. जयंत पाटील आदींची सदस्यासोबत बैठक झाली. निवडणुकीच्या अनुषंगाने नेते मंडळींनी चर्चा केली. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपची आघाडी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक लढविणार नाही. दोन्ही काँग्रेसचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचे उमेदवार अनुक्रमे राहुल पाटील व जयवंत शिंपी यांना सभागृहात जाऊन शुभेच्छा द्यायचे असे ठरल्याचे सांगितले. भाजप आघाडी सोबत असलेल्या इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी यापूर्वीच राहुल पाटील यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा जाहीर केला होता. दोन्ही पक्षाने माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीच्या सत्तेचा आणि पदाधिकारी निवडीचा मार्ग मोकळा झाला. काँग्रेसचे वीस वर्षे जिल्हाध्यक्ष भूषविलेले आमदार पी. एन. पाटील यांच्या सुपुत्राला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद मिळाले. त्यामुळे पक्षावरील निष्ठेचे फळ मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here