देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधाला. यावेळी त्यांनी नाना पटोले यांनी आघाडी सरकारवर केलेल्या खळबळजनक आरोपांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा केली. या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांना कापरे भरले आहे. त्यांना जेवण जात नाही आहे, तसेच पाणीही पिता येत नाही आहे. ते अत्यंत घाबरलेले आहेत. म्हणूनच त्यांनी नाना पटोले यांच्यावर पाळत ठेवली आहे असे नाना पटोले बोलत आहेत. यावर आता आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर द्यावे, असे सांगतानाच त्याबाबत मी काय बोलणार, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
‘ठवकर कुटुंबाला भाजपकडून आर्थिक मदत’
देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या मनोज ठवकर यांच्या कुटुंबीयांची यांनी भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी ठवकर कुटुंबीयांना भाजपकडून दोन लाखांची आर्थिक मदतही देण्याचे जाहीर केले. मनोज ठवकर हे गुन्हेगार नव्हते, ते कोठडीत नव्हते. मास्क लावला नाही हा काही मोठा गुन्हा ठरत नाही. तो केवळ दंड ठोठावण्याचा गुन्हा आहे. या गुन्ह्यात कोणाला अटक करता येत नाही. तसेच शिक्षाही करता येत नाही. मनोज यांना पकडून पोलिसांनी मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला असून एक प्रकारे ही हत्याच असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. हे लक्षात घेता संबंधित पोलिसांना निलंबित करा, केवळ त्यांची बदली करून त्यांना पाठिशी घालू नका, असेही फडणवीस म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
‘तपास सीआयडीकडे ही चांगली गोष्ट’
मनोज ठवकर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला ही चांगली गोष्ट झाल्याचे फडणवीस म्हणाले. मात्र, सीआयडीचा तपास होईपर्यंत या संबंधित पोलिसांना निलंबित केले पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली. हेल्मेट घातले नाही म्हणून दंड आकारला गेला पाहिजे, या गुन्ह्यासाठी कुणाच्या अंगावर लाठ्या तोडण्याचा अधिकार पोलिसांना नसल्यातेही ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times