अहमदनगर: ‘इंधनाचे दर वाढले हे खरे असले तरी त्या बदल्यात मिळलेल्या सुविधा पाहाव्यात. इंधन दरवाढीविरोधात आंदोलनाचे फलक लावताना करोना प्रतिबंधक लस मोफत दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभाराचे फलकही दाखवा,’ असा अजब युक्तिवाद भाजपचे खासदार यांनी केला आहे. ( on Petrol, Diesel Prices)

डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या विळद घाट येथील रुग्णालयाचे अर्बन सेंटर नगर शहरात सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शहराचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विखे पाटील आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

वाचा:

इंधन दरवाढीच्या विरोधात सुरू असलेल्या काँग्रेसच्या आंदोलनांसंबंधी बोलताना विखे पाटील म्हणाले, ‘इंधनाचे दर वाढले हे खरे असले तरी त्या बदल्यात मिळलेल्या सुविधा पाहाव्यात. इंधन दरवाढीविरोधात आंदोलनाचे फलक लावताना करोना प्रतिबंधक लस मोफत दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभाराचे फलकही दाखवा. ३५ हजार कोटी रुपये खर्चून एवढी मोठी लसीकरण मोहीम सुरू आहे. हेच काम राज्य सरकारकडे होते, तेव्हा जागतिक निविदा काढूनही त्यांना ते करता आले नाही. त्यामुळे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करताना केंद्र सरकारने केलेल्या या जनहिताच्या कामाचीही नोंद घेतली पाहिजे.’

आघाडीत बिघाडी वगैरे नाही, सगळं खोटं आहे!

सध्या राज्यातील महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे भासविले जात आहे, ते सर्व नाटक आहे. राज्य सरकारचे अपयश लपविण्यासाठी जनता आणि प्रसार माध्यमांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे,’ असा आरोपही त्यांनी यावेळी केला. ‘महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातून बिघाडी झाल्याचे मानले जात असेल तरी प्रत्यक्षात हे सगळे खोटे आहे. अस्तित्वाची लढाई म्हणून हे सर्वजण सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत. एवढ्या सहजासहजी ते वेगळे होणार नाहीत. फार तर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगळ्या लढवतील मात्र, विधानसभा, लोकसभेला एकत्र आल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यातील अनेक प्रश्न हातळण्यात सरकार अपयश ठरले आहे. त्याकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठी या वादाला हवा भरली जात असल्याचा आरोपही विखे पाटील यांनी केला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here