पुणे: ‘ ही योजना म्हणजे जलसंधारणाची कामे एकत्रित करून दिलेले गोंडस नाव होते. त्यापेक्षा त्याला जास्त अर्थ नाही,’ अशी परखड टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री यांनी आज केली. राज्यातील जलसंधारणाची कामं सुरूच राहतील, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

ते पुण्यात बोलत होते. महाविकास आघाडीच्या सरकारवर ‘स्थगिती सरकार’ म्हणून होणारे आरोप पाटील यांनी फेटाळले. ‘आमच्या सरकारने कशालाही स्थगिती दिलेली नाही. जलसंधारण खात्याच्या कामांनाही स्थगिती दिलेली नाही. कोणत्याही मागच्या योजनांना स्थगिती देण्यात आलेली नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार जाण्याच्या दोन महिने अगोदर निधीचे वाटप हे स्वत:च्या सोयीच्या कार्यकर्त्यांसाठी करण्यात आले, त्यास मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. गरज बघून त्यापैकी काहींवरील अंशत: बंदी उठविण्यात आली आहे,’ असं पाटील यांनी सांगितलं.

‘जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली केवळ घोषणा करण्यात आल्या. या योजनेतून तकलादू कामे झाल्याची तक्रार आम्हीच विधिमंडळात केली होती. काही कामे झालीच नाहीत; तरीही पैसे देण्यात आले, अशाही गोष्टी झाल्या आहेत. सुमार दर्जाची कामे होऊनही पैसे जास्त गेल्याचेही प्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहेत. या सर्वाची संबंधित विभागांमार्फत योग्य ती चौकशी केली जाईल, असं पाटील यांनी सांगितलं.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here