म.टा.प्रतिनिधी,

बैलगाडा शर्यतीस बंदी असताना देखील मावळातील शिवणे गावच्या हद्दीतील मोकळ्या माळावर कायद्याचे उलंघन करून बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. याप्रकरणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणाऱ्यांना २० हौशी युवकांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A case has been registered against 20 people in connection with organizing a )

गणेश दत्तात्रय म्हस्के (वय- २७), हनुमंत शिवाजी म्हस्के (वय-२५), विक्रम बाळासाहेब केंडे (वय-३०),आदिनाथ बाळू म्हस्के (वय २३, सर्व रा. शिवणे, मावळ), आदिनाथ बाळू गराडे (वय- २७, रा.धामणे, मावळ), मनोज अंकूश ढोरे (वय -२२, रा. मळवंडी ढोरे, मावळ) व इतर १५ जणांवर बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार अषिश काळे यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-
वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन मावळातील शिवणे गावच्या हद्दीतील पाण्याच्या टाकीजवळील मोकळ्या जागेत बैलगाडा शर्यतीस बंदी असताना देखील रविवारी सकाळी १० वाजल्याच्या सुमारास बैलगाडा शर्यतींचे आयोजन करून बैलांना पिडा होईल अशा प्रकारे क्रूरतेने व निर्दयीपणे वागवून बैलगाडीला जुंपून बैलांना चढणीच्या रस्त्याने घाटात चढायला लावण्याकरिता त्यांचा छळ केला.

क्लिक करा आणि वाचा-
तसेच करोना विषाणूच्या प्रदुर्भावाच्या अनुशंगाने जिल्हाधिकारी यांनी लादलेल्या जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणाऱ्या आरोपींना अटक केली केली असून, संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अजित ननावरे हे करत आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here