‘काँग्रेसनं स्वबळाची भाषा केल्यानं व राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू घसरली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. आयबीचा रिपोर्ट रोज सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे जातो. बैठका, आंदोलन कुठे सुरू आहेत, काय परिस्थिती आहे याची माहिती घेतली जाते. मी इथे आहे याचा सुद्धा रिपोर्ट गेला असेल. रात्री ३ वाजता माझी सभा पार पडली हे कोणाला माहिती नसेल, पण त्यांना माहिती आहे. कारण त्यांच्याकडं ती व्यवस्था आहे,’ असं पटोले म्हणाले होते. त्यांच्या आरोपांनंतर शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं आज हे आरोप फेटाळताना पटोले यांनी आधी सिस्टिमची माहिती घ्यावी, असा टोला हाणला आहे.
वाचा:
या पार्श्वभूमीवर पटोले यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीकडं आपल्या विधानाचा खुलासा केला आहे. ‘मी़डियानं माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. त्या व्हिडिओ क्लिपचा अर्थ तसा नाही. माझे आरोप राज्य सरकारवर नव्हे तर केंद्र सरकारवर होते. पक्ष वाढीसाठी आम्ही स्वबळाचा नारा दिला तर ते चूक आणि इतरांनी हे वक्तव्य केलं तर ते योग्य? असं मी बोललो होतो. पण पाळत ठेवण्याबाबत मी जे बोललो, त्याचा राज्य सरकारशी संबंध नाही. माझा राज्य सरकारवर कोणताही आरोप नाही. मुंबईत आल्यावर याबाबत सविस्तर बोलेन,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
वाचा: वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times