म.टा. प्रतिनिधी, नागपूर

बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांडाचा तपास कुठवर आला आहे याबाबतचा अहवाल १० ऑगस्टपर्यंत सीलबंद लिफाफ्यात सादर करण्यात यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सीबीआयला दिले आहे. याप्रकरणी हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान न्या. विनय जोशी आणि न्या.अमित बोरकर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिलेत. (the report of the investigation into the should be submitted in a sealed envelope )

ही घटना ६ सप्टेंबर २०१६ ला लाल इमली चौकात घडली होती. आर्किटेक्ट निमगडे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासावर असमाधान व्यक्त करीत निमगडे यांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. सीबीआयने २२ डिसेंबर २०२० रोजी तपास बंद करीत प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयापुढे अहवाल सादर केला होता. त्यानंतर काही आरोपींवरील संशय बळावला.

क्लिक करा आणि वाचा-
नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सीबीआयने नव्याने तपास सुरू केला. निमगडेंचा मुलगा अॅड. अनुपम निमगडे यांनी दाखल केलेल्या याचिकेत सीबीआयच्या तपासाच्या गतीवर आक्षेप घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा अहवाल प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचू नये यामुळे न्यायालयाने सीबीआयला सीलबंद लिफाफ्यात हा अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here