अकोला : राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार ( MLC Health Update) यांच्या प्रकृतीविषयी सोमवारी दिवसभर उलट-सुलट चर्चा रंगल्या. मिटकरी यांना अर्धांग वायूचा सौम्य झटका आल्याचंही बोललं गेलं. मात्र या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसून मी एकदम ठणठणीत आहे, असा खुलासा अमोल मिटकरी यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी रुग्णालयातून एक व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.

‘आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादामुळे मी एकदम ठणठणीत असून सोशल मीडियामधून येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मला कुठलाही अर्धांगवायूचा झटका वगैरे आला नाही. माझी प्रकृती उत्तम असून सध्या अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. लवकरच जनसेवेत रुजू होईल,’ असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

अमोल मिटकरी यांना नेमका कोणता आजार ?
अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका आल्याचं सांगितलं जात असलं तरी ही चर्चा खोडून काढत स्वत: मिटकरी यांनी आपल्या आजारपणाविषयी माहिती दिली आहे. ‘मला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. पोस्ट कोव्हिडमुळे मेंदूला रक्तपुरवठा करणारी जी छोटी नस असते त्यातून व्यवस्थित पुरवठा झाला नाही, परिणामी मला अस्वस्थ वाटू लागलं. मात्र आता माझी तब्येत ठणठणीत आहे,’ अशी माहिती मिटकरी यांनी दिली आहे.

समर्थकांना खास आवाहन
आपल्या वक्तृत्वशैलीमुळे आणि भाजपवरील आक्रमक टीकेमुळे अमोल मिटकरी हे कायमच चर्चेत असतात. राष्ट्रवादी पक्षात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या मिटकरी यांनी आपल्या या समर्थकांसाठी खास आवाहन केलं आहे. ‘करोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आपल्यापैकी कोणीही मला भेटण्यासाठी रुग्णालयात येऊन स्वत:चा जीव धोक्यात घालू नये. माझ्यासाठी स्वत:च्या जीवापेक्षाही तुमचा जीव महत्त्वाचा आहे,’ असे भावनिक उद्गार अमोल मिटकरी यांनी काढले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here