म. टा. प्रतिनिधी,

महाराष्ट्र राज्यात विक्रीस मनाई असलेला लाखो रुपयांचा अवैध विदेशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील सांगवी शिवारात रविवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक, चाळीसगाव, अमळनेर आणि मालेगावच्या पथकांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली असून, त्यात लाखो रुपयांच्या विदेशी मद्याच्या साठ्यासह, १ ट्रक असा सुमारे १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ( worth lakhs of rupees seized in )

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातून लाखो रुपयांच्या विदेशी मद्याच्या साठ्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्या अनुषंगाने विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ यांनी तातडीने नाशिक, चाळीसगाव, अमळनेर आणि मालेगाव येथील पथकांना सतर्क करून सापळा रचण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर चाळीसगाव-औरंगाबाद रस्त्यावर सांगवी शिवारात बोढरे फाट्याजवळ वाहन तपासणीसाठी पथके थांबली होती. रविवारी रात्री उशिरा एक ट्रक त्याठिकाणी आला. ट्रकची तपासणी केली असता त्यात लाखो रुपयांचा विदेशी मद्याचा साठा आढळून आला. पथकाने याप्रकरणी ट्रक चालक अजय कन्हैयालाल यादव (वय ४१, रा. इंदूर, मध्यप्रदेश) याला अटक केली.

क्लिक करा आणि वाचा-
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे १ कोटी ३ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात गोवा राज्यात निर्मित व विक्रीस परवानगी असलेली रॉयल ब्लू मॉल्ट व्हिस्कीच्या १८० मिलीलीटरच्या ६० हजार ४८० बाटल्या (१२६० बॉक्स), मद्य ठेवण्यासाठी असलेले ६ प्लायवूडचे खोके, चालकाचा मोबाईल फोन तसेच, टाटा कंपनीचा (एमपी ०९ एचजी ९३५४) क्रमांकाचा ट्रकचा समावेश आहे.

क्लिक करा आणि वाचा-
याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्य कोठून आणले होते, ते कोठे नेले जात होते, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक सी. एच. पाटील यांनी दिली.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here