: पारडी येथे पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत मनोज ठवकर या दिव्यांगाचा मृत्यू झाला. या मारहाणीचा प्रत्यक्षदर्शींनी काढलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपराजधानीतील राजकीय वातावरण तापलं आहे. ही मारहाण अमानुष असून दोषी पोलिसांवर तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री यांनी सोमवारी पारडी इथं ठवकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

यासंदर्भात मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना भेटून पाठपुरावा करण्याची हमीही देवेंद्र फडणवीस यांनी ठवकर कुटुंबियांना दिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला मास्क नाही वापरला म्हणून अशाप्रकारे मारहाण करण्याचा पोलिसांना अधिकार नाही. केवळ दंडाची तरतूद असताना मरेपर्यंत मारणे व यात त्या व्यक्तीचा मृत्यू होणे ही हत्या नाही तर काय आहे? अशा परिस्थितीत संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनाना तातडीने निलंबनाचा कायदा आहे. परंतु पोलिस आयुक्तांनी केवळ बदली करून थातुरमातूर कारवाई केली, असा आरोपही त्यांनी केला.

भाजपातर्फे २ लाख रुपयांची मदत
या प्रकरणी चौकशी होईल, कारवाई होईल. हा भाग वेगळा, परंतु ठवकर परिवारावर जे संकट आले त्यांना वेळीच मदत मिळणे आवश्यक आहे. तोपर्यंत भारतीय जनता पार्टी, नागपूर महानगरच्या वतीने २ लाखांची मदत देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

दरम्यान, याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारकडून काय पाऊल उचलले जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here