मध्य प्रदेशात विज कोसळून दोन दिवसांत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात विज कोसळल्याने ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमधील अमोर किल्ल्यात जाण्याची परवानगी ही संध्याकाळी सात वाजेपर्यंतच आहे. पण जवळपास २५ जण रविवारी ८ वाजेपर्यंत किल्ल्यात होते. यादरम्यान, पाऊस आणि विज कोसळली. यात १२ जणांचा मृत्यू झाला. हे बहुतेक जण सेल्फी घेण्यासाठी किल्ल्याच्या वॉच टॉवर गेले होते. यातील एका जखमीने पोलिसांना फोन केला आणि त्यानंतर बचावकार्य सुरू झालं. ज्या ठिकाणी ते पडले होते तिथे विजेची कुठलीही सुविधा नव्हती. रात्रीच्या अंधारात पोलिसांनी मोबाइलवरील फ्लॅश लाइट लावून नागरिकांना उतरवलं. रात्रभर हे बचावकार्य सुरू होतं.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी केली मदतीची घोषणा
पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या वारसांना दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजरा रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत घोषित केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times