लखनऊः उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांना यूपी ATS ने अटक केली. आता दहशतवाद्यांच्या या अटकेवरून समाजवादी पक्षाचे नेते यांनी संशय घेत वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यावरून यूपीत राजकारण तापलं आहे. आपल्याला विशेष करून भाजप सरकारवर कुठलाही विश्वास नाहीए, असं वक्तव्य अखिलेश यादव यांनी रविवारी केलं होतं. आता त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं पक्षाकडून सांगण्यात येत आहे. तसंच व्हायरल होत असलेली व्हिडिओ क्लिप ही एडिट केलेली आहे. दहशतवाद्यांच्या अटकेची माहिती कुणालाही नव्हती तेव्ह माजी मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं होता, असा आरोप पक्षाने केला आहे.

अल कायदाच्या अन्सार गजवतुल हिंद या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केल्याचं यूपी सरकारने रविवारी सांगितलं होतं. आत्मघातकी बॉम्ब हल्ल्याचा कट दहशतवाद्यांनी रचल्याचं यूपी पोलिसांनी रविवारी सांगितलं होतं. उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. यामुळे आता या घटनेवरून राजकारण सुरू झालं आहे. भाजप नेत्यांनी अखिलेश यादव यांचं वक्तव्य सोशल मीडियावर शेअर केलं. उत्तर प्रदेश पोलिस आणि भाजप सरकारवर विश्वास नाही, असं अखिलेश यादव म्हणत आहे. भाजपच्या लसीवरही विश्वास नाही, असं यापूर्वी अखिलेश म्हणाले होते. मग त्यांचा विश्वास कोणावर आहे? पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या दहशतवाद्यांवर, अशी टीका भाजप नेत्या सी. टी. रवि यांनी केली.

अखिलेश यादव यांना आधी लसवर संशय होता. आता त्यांना दहशतवाद्यांविरोधातील यूपी पोलिसांच्या कारवाईवर विश्वास नाही. त्यांना सरकारवर आणि प्रशासनावर विश्वास नाही. तर मग त्यांना मुख्यमंत्री का व्हायचं आहे? त्यांनी घरीच बसावं, असा टोला भाजपचे अमित मालवीय यांनी लगावला. तर अखिलेश यादव हे कोणत्या देशाच्या बाजूने बोलत आहेत, हा मोठा प्रश्न आहे, असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईवर अखिलेश यादव यांनी गर्व करायला हवा. पण त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांचा अपमान केला आहे. देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे की राजकारण? याचं उत्तर त्यांनी द्यावं, असं उत्तर प्रदेश भाजपने विचारला.

दुसरीकडे बसपा नेत्या यांनीही पोलिस कारवाईवर संशय व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जवळ आल्याने अशा प्रकारच्या कारवाईने नागरिकांच्या मनात एक संशय निर्माण करणारी आहे. या कारवाईमध्ये इतकी सत्यता आहे तर मग पोलिस इतक्या दिवसांपासून गाफिल का होते? हा प्रश्न लोक विचारत आहेत. सरकारने अशी कुठलीही कारवाई करून ज्यामुळे जनतेत अस्वस्थता निर्माण होईल, असं मायावती म्हणाल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here