हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी,Heavy rains in Maharashtra, IMD issues red alert in raigad, ratnagiri कोल्हापूर, सातारा येथे घाट भागांसाठी सुधारित इशाऱ्यानुसार मंगळवारी ‘रेड अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये तुरळक ठिकाणी अती तीव्र मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता आहे. सिंधुदुर्गातही ‘ऑरेंज अॅलर्ट’ कायम आहे. मंगळवारी मुंबईला दिलेला ‘ऑरेंज अॅलर्ट’ मागे घेऊन तुरळक ठिकाणी मुसळधार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला. ठाण्यासाठी दिलेला अॅलर्ट मागे घेण्यात आला आहे. मात्र पालघरचा ‘ऑरेंज अॅलर्ट’ कायम आहे
Live Update
– रत्नागिरीत पावसाची संततधार सुरूच; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
– लांजाः काजळी नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळं तालुक्यातील दत्त भवानी मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा
– राजापूरमध्ये पावसाचा कहर; मुंबई गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल केला वाहतुकीसाठी बंद
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times