कालपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार अद्यापही सुरू आहे. रत्नागिरीत कोसळधारा सुरू आहे. त्यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांच्या रौद्ररूप पाहायला मिळते. त्यामुळे अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 130.26 मिमी तर एकूण 1172.30 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तीन दिवसापासून रत्नागिरीत मुसळधार पाऊस होता. त्यामुळे नदी नाले अक्षरशः दुथडी भरून वाहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस मंडणगडमध्ये झाला आहे.
मंडणगडमध्ये 215.10 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात, दापोली 94.30 मिमी, खेड 46.50, गुहागर 135.60 मिमी, चिपळूण 102.50 मिमी, संगमेश्वर 145.00 मिमी, रत्नागिरी 162.90 मिमी, राजापूर 128.70 मिमी, लांजा 141.70 मिमी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. दिवसभर मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times