नांदेड : राज्यात करोनाच्या पार्श्वभूमिवर आता राजकीय वातावरणही तापलं आहे. आगामी निवडणुकांसाठी राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांनी चांगलीच कंबर कसली आहे. अशात आता महाराष्ट्रात लावणी सम्राज्ञी म्हणून ओळख असलेल्या सुरेखा पुणेकर यांनी विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली विधानसभा मतदार संघातून पुणेकर निवडणूक लढविणार आहेत. त्यांनी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांच्याकडे तशी मागणी केली आहे. देगलूर मतदार संघाचे आमदार रावसाहेब आंतापूरकर यांचे निधन झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुकांनी गर्दी केली आहे.

यावर आता तर थेट लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने या निवडणुकीत आणखीनच रंगत येणार असल्याची चर्चा सुरेखा पुणेकर यांच्या चहात्यांत आहे. पुणेकर आज नांदेडमध्ये बोलत होत्या.

खरंतर, याआधी सुरेखा पुणेकरांनी देखील राष्ट्रवादीकडे (ncp) आमदार होण्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती. मात्र, सुरेखा पुणेकरांना प्रतिसाद मिळत नसल्याचे देखील त्यांनी बोलून दाखवले होतं. संपूर्ण महाराष्ट्रात तमाशाचे फड रंगवणाऱ्या सुरेखा पुणेकर आता राजकारणाचे फड रंगवणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here