मुंबईः खासदार () यांना केंद्रात मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं मुंडेंच्या नाराज समर्थकांनी राजीनामासत्र सुरू केलं होतं. या नाराजीनाट्यानंतर भाजपच्या नेत्या (Pankaja Munde) यांनी आज समर्थकांसोबत संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचे राजीनामे नांमजूर करतानाच आपलं घर का सोडायचं?, असा सवालही पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केला आहे.

प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद नाकारल्यानंतर पंकजा मुंडे या दिल्लीला रवाना झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व जे. पी. नड्डा यांची भेट घेत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती. मात्र, या सर्व चर्चा पंकजा मुंडे यांनी फेटाळून लावल्या आहेत. तसंच, ‘पंतप्रधानांनी व कोणत्याही राष्ट्रीय नेत्यांनी मला अपमानित केलं नाही,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

‘माझे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. जे. पी. नड्डा आहेत. त्यांच्या मनात काहीतरी चांगलं आहे असा मला विश्वास आहे, असं सांगातानाच पक्षानं मला जे दिलं, ते मी लक्षात ठेवेन. पण नाही दिलं ते मला सल्ला देणाऱ्यांनी लक्षात ठेवावं,’ असा टोला पंकजा यांनी लगावला आहे.

‘दिल्लीत गेल्यानंतर अनेकांनी मला तिथं झापल्याच्या बातम्या दिल्या. पण माझ्या चेहऱ्यावरुन असं वाटतंय का?, दिल्लीत माझी अनेकांशी चर्चा झाली. तेव्हा मी जे. पी. नड्डा यांच्या कानावर कार्यकर्त्यांच्या नाराजीची माहिती घातली. यावर त्यांनी मला कार्यतकर्त्यांची समजूत घालण्याच्या सूचना दिल्या. व कार्यकर्ते माझं म्हणणे एकून घेतील असा विश्वासही दिला,’ असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

‘मंत्रिपदाची मागणी हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार नाहीत. माझ्या समाजातील किंवा तळागाळातील कोणी कार्यकर्ता मंत्री होत असेल तर मला दुःख का व्हावं?, प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळालं नाही. आज आम्ही चाळिशीत आहोत. डॉ. ६५ वर्षांचे आहेत. त्यांना मी अपमानित का करु?,’ असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे.

वाचाः

‘मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं. तळागाळातील माणूस सर्व ठिकाणी पोहोचला पाहिजे हे मुंडे साहेबांना वाटत होते. मुंडे साहेबांनी संघर्ष यात्रा भाजपचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात बसावा म्हणून काढली होती. केंद्रात मंत्रिपद मिळावं म्हणून काढली नव्हती,’ असं सांगातानाच मला पदाची व सत्तेची लालसा नाही, असं स्पष्ट केलं आहे.

‘निवडणुकीत मी हरले असले तरी मी संपले नाहीये. संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते. मला प्रवास खडतर दिसतोय, मागेही होता आणि आताही आहे, असं सूचक वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं आहे. तसंच, केंद्रीय मंत्रीपद मिळालं नसलं तरी मी पक्षाची राष्ट्रीय मंत्री आहे,’ असं पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here