खासदार () यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज झालेल्या राज्यभरातील मुंडे समर्थकांनी राजीनाम्याचं पाऊल उचललं होतं. पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी शेकडो कार्यकर्ते मुंबईत धडकले. या सर्व समर्थकांचे राजीनामे पंकजा यांनी फेटाळून लावले. पद मिळवणं हे आपलं ध्येय नाही. आमदारकी, खासदारकी आणि मंत्रीपद हा आपल्या राजकारणाचा पाया नाही. मुंडे साहेबांचा वारसा चालवण्यासाठी मी राजकारणात आलेली नाही. वंचितांच्या बाजूनं प्रस्थापितांविरोधात लढण्यासाठी मी राजकारण करते आहे. मला माझ्यासाठी, प्रीतमसाठी, अमितसाठी किंवा यशस्वीसाठी काही नको. समाजासाठी हवं आहे. वंचितांचं, तळागाळातील लोकांचं राजकारण करताना मला आई व वडील या दोन्ही भूमिकांमधून निर्णय घ्यावा लागतो. अविचारानं निर्णय घेऊन कसं चालेल?,’ असा सवाल पंकजा यांनी कार्यकर्त्यांना केला.
वाचा:
‘केंद्रीय मंत्रीपद मिळालं नसलं तरी आज मी पक्षाची राष्ट्रीय मंत्री आहे. मला प्रवास खडतर दिसतोय. मागेही होता, आताही आहे. निवडणुकीत माझा पराभव झाला पण म्हणून मी संपलेले नाही. संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते. योग्य निर्णय घ्यायची वेळही योग्य असते. त्यामुळं आपला जो प्रवास सुरू आहे त्याला तूर्त स्वल्पविराम देऊ,’ असंही त्यांनी सांगितलं.
पक्षातील विरोधकांवर निशाणा
समर्थकांची समजूत घालताना पंकजा यांनी महाभारतातील कौरव-पांडवांचं उदाहरण दिलं. ‘पांडवांवरही अन्याय झाला होता, पण तरीही ते जिंकले. शिवाय, त्यांनीच युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला. जो चांगला असतो, तो लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून प्रयत्न करतो. माझीही तीच भूमिका आहे. कौरवांच्या सेनेतील अनेक लोक मनानं पांडवांच्या सोबत होते. फक्त शरीरानं कौरवांच्या सोबत होते हे विसरू नका,’ असं म्हणत, पंकजांनी अप्रत्यक्षपणे पक्षातील विरोधकांवर निशाणा साधला. मात्र, हे करताना त्यांनी कोणाचंही थेट नाव घेतलं नाही.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times