म. टा. प्रतिनिधी, पुणेः भारती विद्यापीठातील स्टाफ क्वॉर्टरमध्ये (() राहणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या घरात छुपे कॅमेरे शहरातील एका एमडी डॉक्टरने लावले असल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणी त्या एमडी डॉक्टरवर गुन्हा दाखल करून, त्यास अटक केली आहे. आरोपी डॉक्टर हा भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात लेक्चर घेण्यासाठी देखील जात होता.

भारती विद्यापीठ कॅम्पसमधील स्टाफ क्वॉर्टरमध्ये राहणाऱ्या महिला डॉक्टरच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये अज्ञाताने छुपे कॅमेरे लावल्याची धक्कादायक घटना सहा जुलैला उघडकीस आली होती. त्या प्रकरणी महिला डॉक्टरने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांकडून आरोपीला शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. यामध्ये आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. सुजित आबाजीराव जगताप (वय ४२) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्यांचा हिराबाग येथे मोठा दवाखाना आहे.

वाचाः
आरोपीने हे छुपा कॅमेरा असणारा बल्ब इ-कॉमर्स वेबसाइटवरून मागवला असल्याचे समोर आले आहे. आरोपीकडे फिर्यादीच्या घराच्या कुलुपाची बनावट चावी होती. त्या चावीच्या सहाय्याने आरोपीने फिर्यादीच्या घरात प्रवेश करून, छुपे कॅमेरे असणारे बल्ब लावले होते.

वाचाः

नेमके काय घडलेले?
फिर्यादी महिला डॉक्टर भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये नोकरीला आहेत. त्या सहा जुलै रोजी सकाळी नऊच्या सुमारास कामाला गेल्या आणि सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घरी परतल्या. तेव्हा फ्रेश होण्यासाठी त्या बाथरूममध्ये गेल्या. त्यांनी बल्ब लावलनही तो लागला नाही. त्यानंतर बेडरूममधील बल्ब देखील लागला नाही. त्यांनी इलेक्ट्रिशियनला बोलावून बल्ब दाखवला, तेव्हा इलेक्ट्रिशियनने त्या बल्बमध्ये छुपा कॅमेरा असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here