पांडवांकडे संयम असल्याकारणाने पांडव युद्ध जिंकले. चांगली व्यक्ती नेहमीच युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत असते, असे सांगतानाच मी जो पर्यंत शक्य आहे, तो पर्यंत धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करते, असे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. आम्ही कोणाला भीतही नाही आणि कोणाचा अनादरही करत नाही. मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीचा आदर करते. मला जे काही हवे आहे ते फक्त तुमच्यासाठी हवे आहे, कारण मी तुमच्या पालकाच्या भूमिकेत आहे. म्हणून मला कशाची आवश्यकता नाही, असे पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले आहे. त्यावर वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांनी भाजपला जोरदार टोला हाणला आहे. आता कौरव कोण आहेत आणि पांडव कोण आहेत हे ज्याचे त्याने ठरवावे. सेना त्यांची, कौरवही त्यांचेच आणि पांडवही त्यांचेच, अंगणही त्यांचेच आणि महाभारत देखील तिकडचेच आहे. ते त्यांना लखलाभ व्हावे, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी मुंडे भगिनी आणि भाजप नेत्यांना टोला लगावला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
‘भाजप हे घर, इथं राम राहिला नाही असे वाटेल तेव्हा योग्य निर्णय घेऊ’
भारतीय जनता पक्ष हे आपले घर आहे. मोठ्या कष्टाने आणि प्रेमाने हे घर उभे केले आहे. असे आपले घर आपण का सोडायचे?, असा सवाल करत ज्या दिवशी अंगावर छत पडेल आणि ज्या दिवशी इथे राम राहिलेला नाही, असे वाटेल तेव्हा योग्य तो निर्णय घेऊ असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. आपली शक्ती कमी करण्याचा डाव असून हा डाव पूर्ण होऊ द्यायाचा नाही. मला पुढेही खडतर मार्ग दिसत असून योग्य तो निर्णय घेण्याची योग्य वेळ असते, असे सूचक वक्तव्यही मुंडे यांनी केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times