परभणी : परभणी शहरात मागील दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार ढग फुटीजन्य पाऊसामुळे शहरातील धार रोड, वांगी रोड, येलदरकर कॉलनी, संत गाडगेबाबा नगर, लक्ष्मी नगर परसावत नगर अश्या अनेक भागांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढून अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी साचल्याचे आज भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी सदरील परिसरामध्ये नागरिकांना भेट देऊन नुकसानाची पाहणी करून नागरिकांचे सांत्वन केले.

सोबतच जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांना भेटून नागरीकांना तात्काळ मदत देण्याची मागणी देखील केली. झालेल्या पावसामुळे नागरिकांच्या उदरनिर्वाहाच्या असलेले साधनसामुग्री संपूर्ण नाहीशी झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना तात्काळ मदत देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही करणार असल्याचा त्यांनी सांगितलं.

नुकसानीची पाहणी करताना नगरसेवक रितेश जैन, युवा मोर्चा भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेशजी भुमरे, आकाश लोहट, शिवाजीराव शेळके, विनायक कातकडे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, परभणीमध्ये मुसळधार पावसाने रेल्वे स्टेशनची रुळे पाण्याखाली गेली, रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. पावसाने अनेक दुकानात-घरात पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर जायकवाडीचा कालवा ओव्हरफ्लो झाल्याने फुटला व वांगी रोडवरील झोपडपट्टीमधील घरात-दुकानात पाणी गेल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती आहे.

परभणी शहरात ढगफुटीजन्य परिस्थितीत निर्माण झाली असून काल दुपारी 2 वाजेपासून सुरू असलेल्या पाऊस अद्यापही सुरूच आहे. सततच्या संततधारमुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या बजारपेठेतील दुकानात गुढघ्याइतकं पाणी साचलं आहे. शहरात सायंकाळपर्यतच्या जोरदार पाऊसाने सखल भागातील वसाहती व झोपडपट्ट्यांत घराघरात मोठ्या प्रमाणावर पाणी घुसल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here