पुणे: ‘ यांचं भाजपमध्ये फारसं योगदान नाही. ते पक्षात आले आणि निवडणुकीत पडले. त्यामुळं पक्ष त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची घाई करणार नाही,’ असं म्हणत, भाजपचे पुण्यातील नेते यांनी राज्यसभेच्या उमेदवारीवर जोरदार दावा केला आहे.

वाचा:

महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. त्या जागी वर्णी लागावी म्हणून भाजपमध्ये यावेळी जोरदार चुरस आहे. महाराष्ट्रातून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले व विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना राज्यसभेत पाठवणार असल्याचं बोललं जातंय. अमित शहा यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं बोललं जातंय. त्याच पार्श्वभूमीवर संजय काकडे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली इच्छा बोलून दाखवली.

वाचा:

‘मी यावेळी सहयोगी म्हणून नव्हे तर भाजपकडून इच्छुक आहे. पुणे महापालिका असेल किंवा विधानसभा निवडणुकीत केलेल्या कामाच्या जोरावर, मेरिटवर मला पक्ष उमेदवारी देईल याची मला १०० टक्के खात्री आहे,’ असं ते म्हणाले. उदयनराजे यांचं नाव राज्यसभेसाठी निश्चित झाल्याचं निदर्शनास आणलं असता त्यांनी त्याबाबत अनभिज्ञता दर्शवली. ‘उदयनराजे यांना राज्यसभेत पाठवण्याची इतकी घाई पक्ष करेल असं वाटत नाही. उदयनराजे यांचं पक्षात फारसं योगदाना नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून पक्षात आले आणि निवडणुकीत पडले. त्यांच्या मतदारसंघात त्यांचे भाऊ वगळता भाजपचा इतर कुणी आमदारही जिंकू शकला नाही. त्यामुळं त्यांना राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय झाला असेल असं वाटत नाही,’ असं काकडे म्हणाले.

हंसराज अहिर यांच्या राज्यसभा उमेदवारीची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली. ‘अहिर यांना मंत्री म्हणून संधी मिळाली आहे,’ असं काकडे म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here