पुणे : महानगरपालिका निवडणुकीआधी ( Election) शहरातील राजकारण चांगलंच तापू लागलं आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप (NCP Prashant Jagtap) यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. महापालिकेत नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांचा विकास आराखडा तयार करण्याच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार करण्याचा सत्ताधारी भाजपचा डाव आहे, असा घणाघात प्रशांत जगताप यांनी केला.

‘ राज्यात सत्तेत असतानाच पीएमआरडीने या गावांच्या विकास आराखड्याचे काम सुरू केले होते. भाजपच्या पालिकेतील पदाधिकाऱ्यांचा त्यांच्याच नेत्यांवर विश्वास नसल्याचे दिसते. गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयानंतर अवघ्या बारा दिवसात विशेष सभा बोलविण्याचा निर्णय संशयास्पद आहे. नव्या गावांच्या विकास आराखड्याबाबत इरादा जाहीर करण्यासाठी बोलावलेली विशेष सभा बेकायदेशीर असून त्याविषयी आम्ही राज्य सरकारकडे दाद मागणार आहे,’ असंही प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.

‘निवडणूक निधी जमा करण्याचा भाजपचा डाव’
‘विकास आराखड्याच्या माध्यमातून निवडणूक निधी गोळा करण्याचा भाजपचा डाव आहे. महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांचा विकास आराखडा (डीपी) तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी खास सर्वसाधारण सभा घेण्यात येणार असून येत्या गुरुवारी १५ जुलैला ही खास सभा होणार आहे. ही सभा बेकायदेशीर आहे,’ असा दावा जगताप यांनी केला. महाविकास आघाडी उद्या बैठक घेणार असून त्यानंतर आणि एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, पुणे महानगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने भाजप विरुद्ध असा सामना रंगू लागला आहे. राष्ट्रवादीकडून महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर जोरदार प्रहार केला जात आहे. दुसरीकडे महापौर मुरलीधर मोहोळ हेदेखील राष्ट्रवादीच्या टीकेला जशास तसं प्रत्युत्तर देत आहेत. त्यामुळे आगामी काळात हा सामना अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here