मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या नात्याबद्दल अनेकदा वेगवेगळ्या चर्चा होताना दिसतात. हे दोघंही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. अनेकदा दोघंही त्यांच्या सोशल मीडिया हॅन्डलवर एकमेकांचे फोटो शेअर करतात तसेच एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करतानाही दिसतात. पण नुकत्याच व्हायरल झालेल्या या दोघांच्या फोटोनंतर वेगळीच चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. हे दोघंही इंग्लंडमध्ये एकत्र वेळ घालवत आहेत असं बोललं जात आहे.

सध्या सोशल मीडियावर अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहे. ज्यावरुन युझर्सनी हे दोघंही एकत्र असल्याचा अंदाज लावला आहे. विश्व कसोटी चॅपियनशिपसाठी केएल राहुल सध्या इंग्लंडमध्ये आहे. तर दुसरीकडे अथिया देखील तिच्या भावासोबत इंग्लंडमध्ये आहे. आता एका कॉमन फ्रेंडसोबत या दोघांनी सोशल मीडियावर एकाच वेळी फोटो शेअर केल्यानं हे दोघंही एकत्र असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावायला सुरुवात केली आहे.

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एकाच वेळी एका मैत्रिणीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. यांच्यासोबत फोटोमध्ये दिसत असलेली मुलगी ही आहे. जी ‘अल्ट्री: गिफ्ट्स दॅट मॅटर’ची संस्थापक आहे. सोनालीसोबत या दोघांचे फोटो पाहिल्यानंतर सगळीकडेच अथिया आणि केएल राहुल यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. अनेक युझर्सनी या दोघांचे हे फोटो शेअर करत हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं आहे.

चाहत्यांच्या मते अथिया शेट्टी आणि केएल राहुल बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. अर्थात या दोघांच्या फोटोंची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा झाली असली तरीही त्यांनी मात्र या नात्याबाबत कोणतीही अधिकृत कबुली दिलेली नाही. पण सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत तसेच एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करणं यामुळे चर्चांणा उधाण आलं आहे. अगदी अलिकडेच अथियानं राहुलसोबत काही फोटो शेअर केले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here