नवी दिल्लीः केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी देशातील करोनाच्या स्थितीची माहिती दिली. पर्यटन स्थळं आणि बाजारांमध्ये होणाऱ्या गर्दीवर आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांना करोनाचं संसर्गाचं गंभीर्य समजत नाहीए. आम्ही हवामानाचा अंदाज व्यक्त करतोय, असं नागरिकांना वाटतंय. यामुळेच अनेक ठिकाणी गर्दी होत असून करोनाच्या नियमांची पायलमल्ली होत आहे, असं आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल म्हणाले.

जगात सुरू झालीयः पॉल

जगात अनेक देशांमध्ये करोनाची तिसरी लाट आली आहे. अशा परिस्थितीत तिसऱ्या लाटेचा परिणाम देशावर होणार नाही, याची खबरदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे. सध्याच्या स्थितीत जगात दिवसाला ३.९० लाख करोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. दुसऱ्या लाटेच्या वेळी ही संख्या ९ लाखांवर होती, असं नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य ) डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले. तिसरी लाट कधी येईल? यावर चर्चा करण्यापेक्षा करोनाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष देण्याची गरजा आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

काय आहे देशातील स्थिती?

देशात सध्या ४.३१ लाख अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. करोनातून बरे होण्याचा दर हा ९७.३ टक्के आहे. सध्या देशातील ७३ जिल्ह्यांत रोज १०० हून अधिक करोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. २ जूनला अशा जिल्ह्यांची संख्या ही २६२ इतकी होती. यापूर्वी ४ मे रोजी ही संख्या ५३१ जिल्ह्यांत अशी स्थिती होती.

देशात करोना रुग्णांची संख्या कमी होत असताना महाराष्ट्र आणि केरळसह ५ राज्यांतून सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. सध्या ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण हे फक्त महाराष्ट्र आणि केरळमध्ये आढळत आहेत. याशिवाय तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्येही रुग्ण आधिक दिसून येत आहेत.

मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि अरुणाचलमध्येही नवीन रुग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने ११ राज्यांमध्ये पथकं रवाना केली आहेत. ईशान्येतील राज्यांसह महाराष्ट्र, छत्तीसगड, केरळ आणि ओडिशाचाही समावेश आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here