वाचा:
आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपूर येथे येणार असून यावेळी मंदिराच्या आराखड्याबाबत मोठी घोषणा होण्याची अपेक्षा आहे. मंगळवारच्या बैठकीनंतर बोलताना गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. आता आजच्या बैठकीत मंदिराच्या आराखड्याला अंतिम स्वरूप दिले जाणार असून त्यानंतर पुरातत्व विभागाकडून हिरवा कंदील मिळाल्यावर राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे हा आराखडा मंजुरीसाठी दिला जाणार आहे.
वाचा:
आराखड्यामध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी नूतनीकरण झालेल्या नामदेव पायरीबाबत तीन वेगवेगळ्या मॉडेलवर चर्चा झाली आहे. याशिवाय दर्शन मंडपातून विठ्ठल मंदिरावर येणारी रांग मंदिराबाहेरून आणि मंदिराच्या भिंतीला स्पर्श न करता असावी याबाबत चर्चा झाली. सध्याच्या दर्शन रांगेमुळे मंदिराच्या भिंतीला भविष्यात धोका पोहचू शकणार असल्याने आता मंदिराच्या बाहेरच्या बाजूने स्टिलचा वापर करून दोन मजली दर्शन रांग उभारण्याबाबत चर्चा झाली आहे. यामुळे आराखड्यात १५ कोटी रुपयांची वाढ झाल्याचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times