द्वारकाः गुजरातच्या द्वारकामध्ये प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरावरील ध्वज दंडावर मंगळवारी वीज ( ) कोसळली. वीज कोसळल्याने मंदिराच्या ५२ फूट ध्वजाचे नुकसान झाले आहे. वीजे कोसळल्याने द्वारकाधीश मंदिराचे ( ) कुठलेही नुकसान झालेले नाही. फक्त मंदिराच्या भिंती काळवंडल्या आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. द्वारकाधीश मंदिरावर वीज कोसळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंदिराच्या आजूबाजूला अतिशय दाट लोकवस्ती आहे. अशा या दाट लोकवस्तीवर वीज कोसळली असती तर मोठी दुर्घटना घडली असतील.

द्वारकाधीश मंदिरावर लावण्यात आलेल्या ध्वजाचं एक विशेष महत्व आहे. या ध्वजाला ५२ फूट ध्वजा असे म्हटले जाते. या मंदिरावर दिवसातून ३ वेळा हा ५२ फूट ध्वज चढवला जातो. असं करणारं द्वारकाधीश हे देशातील एकमेव मंदिर आहे. भक्तांमध्ये या ध्वजाबद्दल प्रचंड श्रद्धा आहे. ध्वज चढवण्यासाठी अनेकदा त्यांना दोन वर्षांपर्यंत वाट पाहावी लागते. ‘मंदिराच्या एखाद्या भागावर वीज कोसळली, हे पहिल्यांदाच घडलं आहे. द्वारकाधीशने शहराच्या नागरिकांना मोठ्या दुर्घटनेपासून वाचवलं आहे’, असं स्थानिक नागरिक म्हणाले.

वीज कोसळल्याने मंदिराचे कुठलेही नुकसान नाही

द्वारकाधीश मंदिरावर मंगळवारी दुपारी वीज कोसळली. या घटनेनंतर मंदिर परिसराची तपासणी करण्यात आली. वीजेमुळे मंदिराचे कुठलेही नुकसान झालेले नाही. फक्त ध्वजाचे नुकसान झाले आहे. तापसणीनंतर मंदिरातील पूजा-आरती सामान्यपणे सुरू आहे, असं द्वारकाचे उपजिल्हाधिकारी निहार भेटारिया यांनी सांगितलं.

द्वारकाधीश मंदिर हे गुजरातमधील सर्वात प्राचीन आणि पवित्र मंदिर मानले जाते. हे मंदिर गोमती नदीच्या काठावर आहे. भगवान श्रीकृष्णाचे हे मंदिर आहे. देशीतल श्रीकृष्णाच्या काही प्रमुख मंदिरांपैकी हे एक मंदिर मानले जाते. द्वारकाधीश मंदिर हे सुमारे २२०० वर्षे जुने असल्याचं सांगण्यात येतं. हे मंदिर वज्रनाभ यांनी बांधल्याचं बोललं जातं. या मंदिर परिसरात भगवान श्रीकृष्णासह सुभद्रा, बलराम, रेवती, वासुदेव, रक्मिणीसह अनेक देवी आणि देवतांचेही मंदिर आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीला मंदिरला सजावट ही डोळे दिपवणारी असते. यासह भव्य कार्यक्रमांचंही आयोजन केलं जातं. येथील उत्सव पाहण्यासाठी लाखो नागरिक येत असतात.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here