आज बुधवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.२० रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.१९ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.९२ रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.३५ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.५३ रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.५८ रुपये झाले आहे.
मुंबईत ९७.२९ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८९.७२ रुपये झाले आहे. चेन्नईत ९४.२४ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.८१ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.५० रुपये झाला आहे. बंगळुरात डिझेल ९५.०९ रुपये आहे.तर रविवारी इंधन दर स्थिर ठेवले होते. तर शनिवारी पेट्रोल ३५ पैसे आणि डिझेलमध्ये २६ पैशांची वाढ झाली होती.
मागील दोन महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी ४० वेळा दरवाढ केली आहे. ज्यात पेट्रोल तब्बल १०.८७ रुपयांनी वाढलं आहे. तर याच कालावधीत डिझेलमध्ये देखील तितकीच वाढ झाली आहे.
जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील तेजी कायम आहे. मंगळवारी कच्च्या तेलाचा भाव १.०८ डॉलरने वधारला आणि तो ७६.४९ डॉलर प्रती बॅरल झाला. डब्ल्यूटीआय क्रूडमध्ये ०.९२ डॉलरची वाढ झाली आणि तेलाचा भाव ७५.२५ डॉलर प्रती बॅरल इतका वाढला आहे. सोमवारी कच्च्या तेलाचा भाव ७५.४१ डॉलर प्रती बॅरल झाला होता. ज्यात शुक्रवारच्या तुलनेत ०.२५ डॉलरची वाढ झाली. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.२३ डॉलरने वधारून ७४.३३ डॉलर झाला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times