नवी दिल्लीः मोदी सरकारमध्ये केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमध्ये ( ) आवाज उठवण्याची हिंमत आहे, असं माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसेचे वरिष्ठ नेते पी. चिदम्बरम ( ) म्हणाले. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवर नितीन गडकरींनी केलेल्या टिप्पणीवर चिदम्बरम यांनी ही प्रतिक्रिया दिली. गडकरींमध्ये हिंमत आहे. यामुळे त्यांनी कॅबिनेटमध्ये आपला बुलंद करायला हवा, असं चिदम्बरम म्हणाले. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचं गडकरींनी एका जाहीर कार्यक्रमात स्वीकार केलं होतं.

केंद्र सरकारमधील सर्व निर्णय हे पंतप्रधान मोदी घेतात हे देशातील प्रत्येक नागरिकाला माहिती आहे. यामुळे कोण अर्थमंत्री आहे आणि कोण नाही, याला काही अर्थ उरत नाही. पंतप्रधान स्वतः अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि क्रीडामंत्री आहेत. तेच सर्वेसर्वा आहेत. पण केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमध्येच हिंमत आहे. ते वेळोवेळी आपला आवाज उठवत असतात. पण सध्या तेही गप्प आहेत. त्यांनी आपला आवज उठवला पाहिजे. त्यांनी कॅबिनेटमध्ये आपला आवाज बुलंद केला पाहिजे, असं पी. चिदम्बरम म्हणाले.

काय म्हणाले होते नितीन गडकरी?

नितीन गडकरी यांनी नागपुरात रविवारी लिक्वीड नैसर्गिक गॅस (LNG)च्या फिलिंग स्टेशनचं उद्घाटन केलं. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे नागरिकांमध्ये रोष आहे, असं नितीन गडकीर यावेळी म्हणाले. एलएनजी, सीएनजी किंवा इथोनॉल सारख्या पर्यायी इंधनाच्या अधिक उपयोगाने पेट्रोलच्या वाढत्या दरापासून दिलासा मिळू शकेल, असं नितीन गडकरी म्हणाले.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा अलिकडेच विस्तार झाला आणि फेरबदलही करण्यात आला. खातेवाटपात नितीन गडकरींकडील सूक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्रालय (MSME) काढून घेण्यात आलं. हे खातं महाराष्ट्रातील भाजपचे नेते नारायण राणे यांना दिलं गेलं. नितीन गडकरींना पेट्रोलिय किंवा इतर महत्त्वाचं खातं मिळेल अशी आपेक्षा होती. पण आहे तेही खातं काढून घेतल्याने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here