मुंबई: प्रसिद्ध गायक, छायाचित्रकार व अभिनेते यांनी नुकतीच मुख्यमंत्री यांची सदिच्छा भेट घेतली. दोन कलाकारांच्या या भेटीत संगीत व छायाचित्रण या विषयांवर चर्चा झाली. राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री हेही यावेळी उपस्थित होते. (Singer Meets CM )

मुख्यमंत्र्यांची भेट झाल्याबद्दल लकी अली यांनी आनंद व्यक्त केला. ‘कलाकार या नात्यानं आम्ही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. परस्परांचे अनुभव शेअर करता आले,’ असं त्यांनी सांगितलं. आदित्य ठाकरे यांचंही लकी अली यांनी कौतुक केलं. ‘आदित्य ठाकरे हे हसतमुख व मोकळ्या मनाचे आहेत. आदित्य ठाकरे हे स्वत: मला कारपर्यंत सोडायला आले आणि कारचा दरवाजाही उघडून दिला. वडिलाधाऱ्यांना आदर देण्याचा त्यांचा हा गुण मला भावला,’ असं लकी अली म्हणाले. ‘मुंबई ही माझी जन्मभूमी आहे. हे शहर योग्य व्यक्तींच्या हातात आहे याचा मला आनंद आहे,’ अशा भावनाही लकी अली यांनी व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी हवाई छायाचित्रणाचे संकलन असलेले त्यांचे पुस्तक लकी अली यांना भेट दिले.

कोण आहेत लकी अली?

लकी अली हे प्रसिद्ध गायक आहेत. हिंदी सिनेसृष्टीतील प्रख्यात विनोदी अभिनेते मेहमूद यांचे ते सुपुत्र आहेत. लकी अली यांनी अनेक चित्रपटात अभिनय देखील केला आहे. अभिनेता हृतिक रोशन यांच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटासाठीही त्यांनी पार्श्वगायन केलं होतं. या चित्रपटातील ‘इक पल का जीना’ या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय इतर काही चित्रपटांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केलं आहे. त्यांच्या गाण्याचे अनेक अल्बम प्रसिद्ध आहेत.

आणखी वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here