मुंबई: अंतर्वस्त्रामुळं महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल अभिनेत्री हिनं लिहिलेल्या बिनधास्त व बेधडक फेसबुक पोस्टवरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी तिच्या धाडसाचं कौतुक करत तिला पाठिंबा दिला आहे. ”च्या संस्थापक यांनी हेमांगी कवी हिच्या लिखाणाचं स्वागत केलं आहे. मात्र, त्यांनी हेमांगीला काही प्रश्नही केले आहेत. ( Questions )

हेमांगी कवी हिनं अलीकडंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोळ्या लाटतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यावरून तिला अनेकांनी ट्रोल केलं व अनाहूत सल्लेही दिले. त्यामुळं संतापलेल्या हेमांगीनं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देणारी एक पोस्ट फेसबुकवर पोस्ट केली. ही पोस्ट सध्या खूपच व्हायरल झाली आहे. अनेकदा इच्छा नसतानाही अंतर्वस्त्र वापरासाठी महिलांना कसं भाग पाडलं जातं. त्यामुळं महिलांना किती त्रास सोसावा लागतो, याबद्दल तिनं मत मांडलं होतं. तिच्या या पोस्टला अनेकांनी पाठिंबा दिला. तिचं कौतुकही केलं. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मात्र हेमांगीला काही प्रश्न विचारले आहेत.

हेमांगी कवीची ती पोस्ट

वाचा:
‘हेमांगी कवी नावाच्या अभिनेत्रीनं एक पोस्ट लिहिली. तिच्यावर सध्या चर्चा सुरू आहे. मनमोकळेपणे लिहिलंच पाहिजे. त्याचं आम्ही स्वागतच करतो. मात्र, हे करत असताना आपण प्रत्यक्ष कृतीचाही विचार करायला हवा,’ असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. ‘शिर्डीतील ड्रेस कोडच्या विरोधात आम्ही अलीकडंच आंदोलन केलं होतं. संपूर्ण राज्यात रान पेटवलं होतं. तेव्हा महिलांच्या त्रासाबद्दल बोलणाऱ्या हेमांगी कवी कुठं होत्या? इंदुरीकर महाराज महिलांच्या वेषभूषेविषयी बोलतात. महिलांची बदनामी होईल अशी वक्तव्य कीर्तनातून करतात. तेव्हा त्या का व्यक्त होत नाहीत? मासिक पाळीच्या संदर्भात महिलांशी दुजाभाव केला जातो. अनेक ठिकाणी त्यांना बंदी घातली जाते. त्यावर आम्ही जेव्हा कृतीतून बोलत होतो. अशा वेळी या अभिनेत्री कुठं असतात?,’ असे प्रश्न देसाई यांनी उपस्थित केले आहेत.

‘हेमांगी कवी यांनी आता केवळ एक लेख लिहिलाय. पण आम्ही ‘भूमाता फाउंडेशन’च्या माध्यमातून ‘नो ब्रा डे’ साजरा करण्याचं ठरवलं आहे. आमच्या या उपक्रमात त्या सहभागी होतील,’ अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here