म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘विरोधकांनी कितीही एकमेकांच्या भेटीगाठी घेऊ द्या, कोणाच्याही नेतृत्वाखाली निवडणूक ते लढवू द्या, आगामी लोकसभा निवडणुकीत चारशेपेक्षा जास्त जागा जिंकेल,’ असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष () यांनी कोल्हापुरात केला. आगामी विधानसभा निवडणुकीत () सरकारला जनताच घरी पाठवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वाचा:

राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी यांची दोन वेळा भेट घेतली. आणि यांचीही भेट घेऊन त्यांनी चर्चा केली. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत या भेटीगाठी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी विचारले असता ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. प्रदेशाध्यक्ष पाटील म्ह्णाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दर तीन, सहा महिन्यांनी लोकसभेबाबत लोकांचा फिडबॅक घेत आहेत. त्यामध्ये मतदार भाजपवर खूष असल्याचे दिसत आहे. कारण मोदींनीच अनेकांच्या घरी गॅस कनेक्शन दिले. विकासाच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. याचा फायदा २०२४ च्या निवडणुकीत भाजपला नक्की होणार आहे. त्यामुळे आमच्या या निवडणुकीत चारशेपेक्षा जादा जागा निवडून येतील.

वाचा:

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रोज वादग्रस्त विधान करत आहेत, त्यांच्या वक्तव्यांमुळं महाविकास आघाडी सरकार पडेल का असे विचारले असता पाटील म्हणाले, एकाने मारायचे आणि दुसऱ्याने समजवायचे असा खेळ सध्या राज्यात सुरू आहे. हा खेळ न कळण्याइतकी महाराष्ट्राची जनता मूर्ख नाही. याची शिक्षा त्यांना येणाऱ्या निवडणुकीत मिळेल. सरकारचे जे नाटक सुरू आहे, त्याला जनता कंटाळली आहे. सत्तेचे महत्त्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना माहीत आहे. त्यामुळे ते कितीही भांडले तरी सरकार पडू देणार नाहीत. पण, आगामी विधानसभा निवडणुकीत या सरकारला जनताच घरी पाठवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here