मुंबई: मुंबई (Corona in Mumbai) महापालिका क्षेत्रात आज कालच्या तुलनेत करोनाच्या (Coronavirus) नव्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून मुत्यूंची संख्या देखील तुलनेने वाढली आहे. गेल्या २४ तासात ६३५ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ४४१ इतकी होती. तर, दिवसभरात ५८२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कालच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. काल ही संख्या ६०० इतकी होती. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाने १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ८ इतकी होती. (mumbai registered 635 new cases in a day with 582 patients recovered and 10 deaths today)

याबरोबरच, मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख ४ हजार २५९ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १५ हजार ६५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६ टक्के इतके असून कोविड रुग्णवाढीचा दर ०.०७ टक्के इतका खाली आला आहे. त्याचवेळी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता ९२८ दिवसांवर जाऊन पोहचला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

मुंबईत आज ३५ हजार ९६८ चाचण्या

मुंबईत आज एकूण ३५ हजार ९६८ कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये ८ सक्रिय कंटेनमेंट झोन असून एकूण ७५ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती

२४ तासांत बाधित रुग्ण – ६३५
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ५८२
बरे झालेले एकूण रुग्ण – ७०४२५९
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९६%
एकूण सक्रिय रुग्ण- ६९८९
रुग्ण दुपटीचा कालावधी- ९२८ दिवस
कोविड वाढीचा दर (०७ जून ते १३ जुलै)- ०.०७ %

क्लिक करा आणि वाचा-

ठाण्यात आढळले ७८ नवे रुग्ण

दरम्यान, ठाणे महापालिका क्षेत्रात आज दिवसभरात एकूण ७८ बाधित नवे रुग्ण आढळले आहेत. तर एकूण ९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज दिवसभरात एकूण ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात आतापर्यंत एकूण १ लाख ३१ हजार ६८२ रुग्ण बरे झाले असून एकूण २ हजार ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here