आजच्या १७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख ४४ हजार ८०१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१७ टक्के एवढे झाले आहे.
सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ०६ हजार ७६४ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १७ हजार ३८९ इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात एकूण १६ हजार ०९६ इतके रुग्ण आहेत. त्यानंतर कोल्हापुरात सक्रिय रुग्ण सर्वात जास्त आहेत. कोल्हापुरात ही संख्या ११ हजार ७८४ इतकी आहे. तर, मुंबई महापालिका हद्दीत सध्या ११ हजार ०८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सांगलीत ही संख्या १० हजार ७४६, साताऱ्यात ही संख्या ७ हजार ८५०, रायगडमध्ये ३ हजार ४४५, रत्नागिरीत ३ हजार ११०, सिंधुदुर्गात २ हजार ६५६, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ३१४ इतकी आहे. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या २ हजार २७९ इतकी झाली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times