पुणे: राज्यसभा उमेदवारीवरून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना टोले लगावणारे भाजपचे यांनी रिपब्लिकन पक्षाचे नेते यांच्या उमेदवारीवरही भाष्य केलं आहे. ‘आठवले यांना कदाचित पुन्हा उमेदवारी मिळेल,’ असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

वाचा:

महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. त्या जागी वर्णी लागावी म्हणून भाजपमध्ये जोरदार चुरस आहे. महाराष्ट्रातून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले व विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची नावं निश्चित झाल्याची चर्चा आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर संजय काकडे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपलं मत मांडलं. ‘उदयनराजे पक्षात आले आणि निवडणूक हरले, तिथंच त्यांचा विषय संपला आहे, असं काकडे म्हणाले.

वाचा:

आठवले यांना मात्र राज्यसभेचं तिकीट मिळू शकतं, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. ‘रामदास आठवले केंद्रात सध्या राज्यमंत्री आहेत. त्यांचा पक्ष २०१२ पासून भाजपच्या सोबत आहेत. २०१४ पासून झालेल्या महापालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाला साथ दिली आहे. आमच्यासोबत आहेत म्हणून पक्ष कदाचित पुन्हा त्यांचा विचार करेल, असं काकडे म्हणाले.

वाचा:

निवडणूक बिनविरोध होईल!

राज्यसभेच्या सात जागांसाठीची ही निवडणूक बिनविरोध होईल, असा दावाही काकडे यांनी केला. ‘महाविकास आघाडी एकत्रितरित्या निवडणूक लढणार असल्यानं भाजपचे फक्त दोनच उमेदवार निवडून येतील अशी जी चर्चा सुरू आहे, ती चुकीची आहे. माझा राजकारणातील अनुभव सांगतो की ही निवडणूक बिनविरोध होईल. भाजपचे तीन उमेदवार निवडून जातील. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि शिवसेना व काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून जाईल, असं काकडे म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here