: विदर्भातील राजकारणात आज एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली आहे. विदर्भाच्या शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज, व विदर्भवादी चळवळीचे नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश ( Ashok Jivtode Joins ) केला आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत डॉ. अशोक जीवतोडे हे राष्ट्रवादीत दाखल झाले. या प्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थिती होती. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.

चंद्रपूर आणि विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज समजले जाणारे प्रा. डॉ. अशोक जीवतोडे यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीने भाजपशी जवळीक असलेला एक परिचित चेहरा आपल्याकडे खेचून घेतल्याचे बोलले जात आहे. विदर्भाच्या विविध जिल्ह्यात पसरलेल्या शिक्षण संस्था आणि ओबीसी महासंघाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर कामाची छाप असलेले डॉ.अशोक जीवतोडे यांच्या रूपाने राष्ट्रवादीला जिल्ह्यात एक दमदार चेहरा मिळाला आहे.

कोण आहेत डॉ. अशोक जीवतोडे?
पूर्व विदर्भात शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचवणारे शिक्षण महर्षी दिवंगत श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांचे वडील श्रीहरी बळीरामजी जीवतोडे गुरुजी १९६५ मधे चिचपल्ली-दुर्गापूर जि.प. क्षेत्रातून जिल्हा परीषद सदस्य होते. त्यानंतर चंद्रपूर पंचायत समितीचे सभापती राहिले आणि १९६७ मध्ये राजूरा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे उमेदवार विठ्ठलराव धोटेंचा चार हजार मतांनी पराभव करत आमदार झाले होते.

विदर्भात व संपूर्ण देशात ओबीसी चळवळ सक्रीय करुन ओबीसींना न्याय देण्याचा व त्यांच्या मागण्या केंद्र व राज्य सरकारकडून मंजूर करण्यासाठी देशभरात विविध राज्यात ओबीसी समाजाचे अधिवेशने घेणे, ओबीसींची चळवळ व हक्कासाठी वेळोवेळी निर्दर्शने व आंदोलने करणारे विदर्भातील ओबीसी चळवळीचे नेते अशी अशोक जीवतोडे यांची ओळख आहे. जीवतोडे यांच्या प्रवेशाने गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादीला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here