NPPA ( ) आपल्या ट्वीटर हँडलवर या संदर्भात माहिती दिली आहे. या सर्व उपकरणांची सुधारित किंमत २० जुलैपासून लागू होईल. ३१ जुलै २०२२ पर्यंत या निर्णय लागू असेल. सध्या या पाचही उपकरणांचं मार्जिन मर्यादा ही ३ टक्के ते ७०९ टक्क्यांपर्यंत आहे.
दुसऱ्या लाटेत निर्माण झाला होता तुटवडा
करोनाची दुसरी लाट टिपेला असताना ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. तसंच आवश्यक टेस्टिंग उपकरणांची मागणी अचानक वाढली होती. यामुळे मेडिकल दुकानांमध्ये ते महागात विकले जात होते. हॉस्पिटल्समधील रुग्णांची गर्दी आणि आरोग्य सुविधांच्या अभावामुळे रुग्णांच्या तपासणीत अडचणी येत होत्या. परिणामी चाचण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणांचा तुटवडा निर्माण झाला. यामुळेच त्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या.
आवश्यक औषधांवरील करात कपात
गेल्या महिन्यात केंद्र सरकारने करोनाच्या उपचारासाठी गरजेच्या असेलल्या १८ उत्पादनांवरील कर कमी केला होता. हँड सॅनिटायजर, पल्स ऑक्सिमीटर, टेस्ट किट, रुग्णवाहिका आणि थर्मामीटरचा यात समावेश होता. करोनाच्या उपचारासाठी गरजेची असलेली टोसिलिजुमेब आणि ब्लॅक फंगसवरील एम्फोटेरिसिन बीवरील जीएसटी ५ टक्क्यांहून शून्य टक्के करण्यात आला होता. रेमडेसिवीरवरील जीएसटीही १२ टक्क्यांहून ५ टक्क्यांपर्यंत कमी केला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times