काही दिवसांमध्ये पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांची आणि उपाध्यशांची निवडणूक होणार आहे. यामुळे जिल्हा परिषद गटस्थापनेसाठी निलेश सांबरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे एकूण ६ सदस्य, तर काँग्रेसचा १ सदस्याचा पाठिंबा घेऊन गट स्थापन करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा यांच्या गटाचा याला विरोध होता. त्यामुळे जिल्हाधिकारींच्या दालनात निलेश सांबरे गट आणि सुनील भुसारा गट यांच्याच वाद निर्माण झाला. ही वादावादी सुरू असताना जिल्हा परिषदेच्या महिला सदस्या मंदा घरट यांना दालनाबाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. तसेच त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आल्याचाही आरोप करण्यात येत आहे.
क्लिक करा आणि वाचा-
राष्ट्रवादीच्या गट स्थापनेला सुनील भुसारा यांनी मोठा विरोध दर्शवला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच हा संघर्ष उफाळून आला. यावेळी पालघरमधील राष्ट्रवादीचे सुहास संख्ये यांच्याशीही सुनील भुसारा यांनी शाब्दिक बाचाबाची झाली. घडलेल्या प्रकारामुळे आपल्याला धोका असल्याचे सांगत गट स्थापन करायला आलेल्या सदस्यांनी पोलीस सुरक्षा मागविली. त्यानंतर या सदस्यांना पोलीसांनी बंदोबस्तात सुरक्षित ठिकाणी नेले.
क्लिक करा आणि वाचा-
येत्या २० तारखेला पालघर अध्यक्ष-उपाध्यक्षपदांसाठी निवडणूक होत असून त्यासाठी गट स्थापन करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीचे सात सदस्य जिल्हाधिकाऱ्यांकडे वेळ घेऊन आलो होतो. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सकाळपासून ताटकळत ठेवले. तसेच त्यांनी आम्हाला बाहेरच बसवून ठेवलं होते, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य संदेश ढोणे यांनी दिली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
खरे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला भेट दिली नाही. त्यामुळे सात सदस्यांनी तेथे ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी राष्ट्रवादीचेच आमदार सुनील भुसारा, माजी सभापती काशीनाथ चौधरी आणि इतरांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये सदस्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी शिवीगाळ देखील केली, असे ढोणे पुढे म्हणाले.
सर्व पक्षाचे सदस्य एकत्र असल्यामुळेच आम्ही गट स्थापन करीत आहोत. आम्हाला त्यांच्यापासून धोका असल्याने आम्ही पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे पोलीस सुरक्षा देण्याची मागणी केलेली आहे, असेही ढोणे यांनी सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times