वाचा:
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. इंधन, गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. या स्थितीत जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. म्हणूनच काँग्रेसने सरकारविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. ७ जुलैपासून राज्यात विविध आंदोलने करून मोदी सरकारच्या या अन्याय्य विरोधात आवाज उठवला आहे. उद्या हँगिंग गार्डनपासून राजभवन पर्यंत सायकल रॅली काढून राज्यपालांना निवेदन देणार आहोत. जनतेचा आवाज केंद्र सरकारच्या कानावर पडेल आणि झोपी गेलेले मोदी सरकार जागे होऊन जनतेला दिलासा मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासाठीच काँग्रेसचा संघर्ष सुरू आहे.
वाचा:
विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.
नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे ठाणे जिल्ह्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यात बदलापूरचे विठ्ठल किणीकर, सुरेश पाटील, मनिषा पोळ, समर्थ लाड, अविनाश पाटील, रोहितकुमार प्रजापती, अनिता प्रजापती, रुपेश अंबेरकर, रतन कांबळे, मनिषा कांबळे, साक्षी दिवेकर, मिरजा आंबेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता. पटोले यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times