नागपूर: येथील मध्यवर्ती कारागृहात गुंडाच्या दोन टोळ्यांमध्ये भडकले. एका गटाने केलेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले. या घटनेने प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे. शेख रिजवान शेख मुजिफ व मोनू मनोज समुद्रे अशी जखमींची नावे आहेत. ( )

वाचा:

मोक्का व खूनाच्या प्रयत्नात (वय २७), मोनू मनोज समुद्रे (वय २६), मोहम्मद अमीर जहीर पटेल (वय २८) हे तिघे न्यायालयीन कोठडी अंतर्गत कारागृहात आहे तर प्रज्वल विशाल शेंडे, शेख रिजवान शेख मुजिफ, संतोष अच्छेलाल गोंड हे तिघे खूनासह गंभीर गुन्ह्यांत कारागृहात आहेत. प्रज्वल, रिजवान व संतोषची टोळी आहे. दोन दिवसांपूर्वी रिजवान, प्रज्वल व संतोष या तिघांनी अमीर जहीर पटेल याला मारहाण केली होती. त्यामुळे अमीरचे साथीदार सौरभ व मोनू संतापले होते. मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मोनू व सौरभने बराक क्रमांक पाचमागे रजिवान याला गाठले. लोखंडी पट्टीने त्याच्यावर हल्ला केला. यात रिजवान जखमी झाला. मारहाणीत मोनूच्याही हाताला जखम झाली. या घटनेने कारागृहात प्रचंड खळबळ उडाली.

वाचा:

तुरूंग रक्षकाने याबाबत पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी मोनू व त्याच्या साथीदाराविरुद्ध गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंडाच्या टोळीतही कारागृहात हाणामारी झाली होती. यात कामठीतील एका कुख्यात गुंडाला गंभीर दुखापत झाल्याची चर्चा होती. मात्र हे वृत्त कारागृह प्रशासनाने फेटाळले होते. गत एक महिन्यांपासून कारागृहातील कैद्यांमध्ये नेहमीच राडा होत असल्याचे वृत्त बाहेर येत आहे. त्यामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here