मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काही दिवसांपूर्वी औरंगाबाद दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी पक्षाबद्दल चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या गद्दारांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा इशारा दिला होता. पक्षातील अंतर्गत बातम्या फोडल्याचा संशय होता. त्यानुसार, राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष गौतम अमराव यांची त्यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाई करणे आणि पक्षाचे आदेश न पाळल्याप्रकरणी जिल्हा अध्यक्ष आणि पक्षाचे प्राथमिक सदस्यपदावरून गौतम अमराव यांना निलंबित करण्यात येत आहे, अशी माहिती पक्षाचे नेते शिरीष सावंत यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times