मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री ()यांनी विरोधी पक्ष नेते यांची ( ) भेट घेतली आहे. यावेळी माजी खासदार समीर भुजबळही उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या () मुद्द्यावर चर्चा झाली.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ‘ओबीसीं’च्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने चार मार्च २०२१ रोजी स्थगिती दिली आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. त्यामुळे पेचप्रश्न निर्माण झाला आहे. आता राज्य सरकारला ‘ओबीसीं’बाबत ‘इम्पिरिकल डेटा’ हा सर्वोच्च न्यायालयात सादर करावा लागणार आहे. केंद्र सरकारकडून ही माहिती राज्य सरकारला मिळालेली नाही. केंद्र सरकारने ही माहिती राज्य सरकराला द्यावी यासाठी सरकार पाठपुरावा करत आहे. त्या पार्श्वभूमीवर आजची ही भेट महत्त्वाची मानली जाते.

आज सकाळीच छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळेस या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाल्याचं कळतंय. ओबीसींच्या विविध प्रश्नांवर यावेळ सकारात्मक चर्चा झाली. भुजबळ यांनी फोटो पोस्ट करत या भेटीची माहिती दिली आहे. आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

पूर्ववत करण्यासाठी केंद्राकडून इम्पेरिकल डाटा मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी भुजबळांनी केली होती. त्यासाठीच आज छगन भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणावर ठराव मांडत असताना मोठा अभूतपूर्व गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले होते. छगन भुजबळ ठराव मांडत असताना भाजप नेत्यांनी आक्रमक होत विरोध केला होता. मात्र, या गोंधळातही ठराव संमत करण्यात आला होता.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here