गगनयान मोहिमेसाठी याच इंजिनाचा वापर करण्यात येणार आहे. इस्रोने याबाबतची माहिती ट्विट करून दिली. या ट्विटवर एलन मस्कने अभिनंदन म्हटले. मस्कने आपल्या ट्विटमध्ये भारताच्या राष्ट्रध्वजाची इमोजी वापरली.
वाचा:
इस्रोतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘इस्रोचे द्रवरूप इंधनावर आधारित विकास इंजिन हे मानवी श्रेणीच्या रॉकेटचे निकष पूर्ण करते की नाही, हे तपासण्यासाठी महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्जन कॉम्प्लेक्स (आयपीआरसी) येथे चाचण्या पार पडल्या. विकास इंजिनाची बुधवारी सलग तिसऱ्यांदा चाचणी यशस्वी झाली. यामध्ये इंजिन २४० सेकंदांसाठी प्रज्ज्वलित करण्यात आले. चाचणीदरम्यान इंजिनाने मोहिमेसाठी आवश्यक सर्व अपेक्षा पूर्ण केल्या असल्याचे इस्रोने म्हटले. ‘विकास इंजिन’ हे भारतात अंतराळ संशोधनाची पायाभरणी करणारे शास्त्रज्ञ विक्रम अंबालाल साराभाई यांच्या नावाचे संक्षिप्त रूप आहे.
वाचा:
गगनयान मोहीम आहे तरी काय?
गगनयान मोहीम भारताची महत्त्वकांक्षी अंतराळ मोहीम आहे. या मोहिमेद्वारे भारत पहिल्यांदा अंतराळवीर असलेले यान अंतराळात पाठवणार आहे. या मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या अंतराळवीरांचे प्रशिक्षण रशियामध्ये सुरू आहे. याआधी सोव्हिएत रशियाच्या अंतराळवीरांसोबत भारताचे राकेश शर्मा यांनी अंतराळात झेप घेतली होती. गगनयान मोहीम पूर्णपणे भारताची असणार आहे.
गगनयान मोहिमेसाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) बाहुबली म्हणून ओळखले जाणारे जीएसएलव्ही मार्क ३ हे तीन टप्प्यांचे रॉकेट वापरण्यात येणार आहे. रॉकेटच्या पहिल्या टप्प्यात (एस २००) घन इंधनाचा समावेश असलेल्या दोन स्ट्रॅपऑन मोटर्सचा (बूस्टर) वापर होतो. दुसऱ्या मुख्य टप्प्यात (कोअर एल११०) द्रव इंधनाचा समावेश असलेल्या दोन विकास इंजिनांची जोडी वापरली जाते. तर, तिसऱ्या टप्प्यात (सी २५) द्रवरूप इंधनाच्या क्रायोजेनिक इंजिनाचा समावेश होतो. रॉकेटची संपूर्ण रचना आणि निर्मिती स्वदेशी असून, त्यामध्ये इस्रोतर्फे १९८०च्या दशकात विकसित करण्यात आलेल्या विकास इंजिनाची महत्त्वाची भूमिका आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times